आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या ग्लॅमरस खासदार, प्रीतम मुंडेंनी मोडीत काढला होता नरेंद्र मोदींचा विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात आदराने घेतले जाते. सामान्‍य शेतकर्‍याचा मुलगा ते केंद्रीय मंत्री हा त्‍यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. मुंडे यांच्या अकाली निधनाने रिक्‍त झालेल्‍या जागेवर निवडून आलेली त्यांची कन्या डॉ.प्रीतम खाडे-मुंडे यांचा आज (17 फेब्रुवारी) वाढदिवस आहे.

 

वडिलांच्या पश्चात प्रीतम यांनी राजकारणात पदार्पण केले. एवढेच नाही तर प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार अशोक एस.पाटील यांना तब्‍बल 6 लाख 96 हजार 321 मतांच्‍या फरकाने विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीच्‍या इतिहासात भारतातील हा सर्वात मोठा विजय आहे. त्‍यामुळे नवा विक्रम प्रस्‍थापित झाला आहे.

 

नरेंद्र मोदींचाही विक्रम मोडला
प्रीतम यांनी लोकसभा पोट निवडणुकीत 6 लाख 96 हजार 321 मतांच्‍या फरकाने विजय मिळवला. हा लोकसभा निवडणुकीत प्रस्‍थापित झाला एक मोठा विक्रम आहे. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने दिला नाही उमेदवार... गौरव खाडेंशी झाला विवाह... व्यवसायाने डॉक्‍टर..

बातम्या आणखी आहेत...