आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होय केला मी विरोध..हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते\'; MIM नगरसेवक मतीन यांची प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांची भाजप नगरसेवकांनी सभागृहात चांगलीच धुलाई केली. त्यावर स्वत: सय्यद मतीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला लोकशाही पद्धतीने आम्ही त्याला विरोध केला. मात्र, भाजपचे नगरसेवकांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते, हल्लाखोर भाजपच्या नगरसेवकांवर महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली केली आहे.  

 

दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यांनी विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर वर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. नंतर त्यांना सभागृहाबाहेर पिटाळून लावले. सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... MIMचे नगरसेवक सय्यद म‍तीन यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ... आणि त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...