आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAPE:धक्कादायक..औरंगाबादेत आठ वर्षीय बालिकेवर नराधमाने घरात घुसून केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील उस्मानपुरा भागात एका नराधमाने आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समाेर साली अाहे. आरोपी फरार असून पाेलिस त्याचा शाेध घेत अाहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, बालिका घरात झाेपली हाेती. नराधमाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. उस्मानपुर्‍यातील छोटा मुरलीधर नगर भागात रविवारी (ता. 15) रात्री घटना घडली.  विशाल प्रताप रिडलॉन (23, रा. छोटा मुरलीधरनगर) आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 

सूत्रांनुसार, पीडित मुलगी लासूर येथून अार्इ अाणि चार बहीणींसाेबत 15 जुलैला माहेरी अाैरंगाबाद येथे वडिलांना भेटण्यासाठी आली हाेती. सगळ्यांनी साेबत जेवण केल्यानंतर रात्री नऊ वाजता पीडिता झोपी गेली. नराधम घरात घुसला अाणि त्याने मुलीवर बलात्कार केला. जाग येताच मुलीने  आरडाओरड केली. बाथरुममध्ये गेलेली मुलीची अार्इ धावतच  घरात अाली तिने अाराेपीला पकडून मारहाण केली. मात्र, हाताला झटका देऊन नराधमाने पळ काढला. मुलीच्या अार्इने उस्मानपुरा पाेलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...