आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमाला कंटाळून किशोरवयीन तरुणीने विष प्राशन करून केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- तालुक्यातील खेडा येथील तरुणाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासला कंटाळून एका किशोरवयीन तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. तरुणीच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुक्यातील आठेगाव येथील सागर ज्ञानेश्वर वाळूंजे हा आरोपी खेडा येथील पूजा रमेश शेळके (16) हिला 'माझ्याशी लग्न कर' असे सांगत छेढ काढत होता. मागील चार महिन्यापासून तो तिला त्रास देत होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी तिला जाणीवपूर्वक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून 10 ऑगस्ट रोजी पूजाने विष प्राशन केले. तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना 13 ऑगस्ट रोजी पूजाचा मृत्यू झशला. मृत तरुणीचे वडील रमेश लक्ष्मण शेळके यांनी ग्रामीण पोलिसांत आरोपी सागर वाळूंजे याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, कुंवरसिंह ठाकूर, राहुल लहाने, मनोज घोडके, विजयसिंह जारवाल हे करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...