आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना बदनाम व्हावी म्हणून डॉ.भापकरांनी मुद्दाम वाढवली कचरा कोंडी, खासदार खैरेंचा थेट आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील कचरा वाढू लागल्यानंतर सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. त्यातच कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 55 किलोमीटर अंतरावरून आपल्या मतदारसंघात कचरा टाकण्याचे आवतन दिले. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेविषयी निर्णय घेणारे जाधव कोण, असा सवाल करतानाच या मागे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर असल्याचा थेट आरोप त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.

 

कचरा प्रकरणात शिवसेना बदनाम व्हावी आणि भाजपला मदत व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. तिकडे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नारेगाव येथे कचरा टाकू दिला नाही. त्याला डॉ. भापकर यांनी मदत केली. त्यामुळे भाजपला फायदा होणार अशी त्यांची अटकळ असल्याचे ते म्हणाले. 

 
खासदार खैर म्हणाले, नवीन प्रकल्प येईपर्यंत नारेगावच्या कचऱ्याच्या ढिगारावर आणखी कचरा पडला असता तर काय बिघडले असते? परंतु कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने तसा निर्णय घेतला नाही. कोर्टाने त्यांना तसे अधिकार दिले होते. डॉ. भापकर या समितीचे अध्यक्ष आहेत. ते तसा निर्णय घेऊ शकले असते. परंतु त्यांनी मुद्दाम अन्य चार जागा माथी मारून भाजपला मदत केली. भाजपला मदत करून त्यांनी पुढे माझ्या विरोधात लोकसभा निवडणुक लढायची आहे. त्यांनी मैदानात यावे. माझ्याकडून स्वागत असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. 

 

जाधव त्याच राजकारणाचे बळी 
जाधव यांचा महापालिकेशी काहीही संबंध नाही. तरीही त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या मतदारसंघात कचरा नेण्याचा निर्णय घेतला. याची माहिती त्यांनी महपौरांनाही दिली नव्हती. यामागे राजकारण असून जाधव हे देखील भाजपच्या व डॉ. भापकर यांच्या राजकारणाची बळी ठरल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला. अर्थात कोणी कचरा टाकू देत असेल तर स्वागतच असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...