आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता न तू वैरिणी...दुसराही मुलगाच झाला या भावनेतून निर्दयी आईने पोटच्या मुलाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहा महिन्यांचा प्रेम नावाचा मुलगा पैठणखेडा येथून अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची तक्रार वेदिका परमेश्वर एरंडे यांनी बिडकीन पोलिस ठाण्यात दिली होती. परंतु या मुलाचा मृतदेह अंगणातील पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये आढळून आला. दुसराही मुलगाच झाला, या भावनेतून जन्मदात्री आईने पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

पैठणखेडा येथे गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. वेदिका परमेश्वर एरंडे या दहा महिन्यांच्या प्रेम नावाच्या मुलासह माहेरी आल्या होत्या. वेदिकांनी 23 जून रोजी बिडकीन पोलिस ठाण्यात दहा महिन्यांचा प्रेम नावाचा मुलगा अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची तक्रार दिली. रात्रभर पोलिस व ग्रामस्थांनी शोध घेतला. मात्र प्रेम सापडला नाही. पोलिसांनी श्वानपथक बोलावले. श्वान सर्वत्र फिरून वेदिकांच्या वडिलांच्या घराच्या अंगणात ठेवलेल्या ड्रम भोवतीच चकरा मारू लागले. तेव्हा पोलिसांनी ड्रमचे झाकण उघडले असता त्या ड्रममध्ये प्रेमचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी मातेला अटक केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...