आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- नालासोपारा येथून हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांना मोठा घातपात करण्याच्या संशयाखाली अटक करण्यात आली. यात मूळ देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या केसापुरीचा शरद कळसकर याला अटक केल्यानंतर आता एटीएसने शहरातील राजाबाजारमधील सचिन नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. 14 ऑगस्ट रोजी सचिन काम करत असलेल्या निराला बाजार येथील कापड दुकानातून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत राज्यभरातून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा दाट संशय सुरक्षा एजन्सीला आहे. यात वैभवच्या घरातून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, गावठी कट्टे, ते तयार करण्याची माहिती असा ऐवज जप्त कण्यात आला होता. यातील कळसकर हा औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे नंतर चौकशीत समोर आले. दरम्यान, कळसकरनंतर आता पुन्हा एटीएसने शहरातील राजाबाजार येथील एका तरुणाला नोटीस बजावून ताब्यात घेत मुंबईला नेले आहे. सचिन नामक हा तरुण एका कापड दुकानात काम करतो. या कारवाईची पथकाने कुटुंबाला नोटीस बजावली होती. दरम्यान, या कारवाईनंतर त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गावाला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.