आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जालना रोडवरील राज पेट्रोल पंप शेजारी अर्धनग्न आंदोलन केले.


सध्या देशभरात मोठ्या प्रमाणत पेट्रोल डिझेलच्या दराने  उच्चांक गाठला आहे. यामुळे अच्छे दिनाचे स्वप्न पाहणाऱ्या आम     जनतेला या सरकारने गाजर दाखवले आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्व घटकांना या इंधन दर वाढीला सामोरे जावे लागत आहे.

 

संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देऊन राग व्यक्त केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, कार्याध्यक्ष रहीम पटेल, शहर कार्याध्यक्ष शेख कयूम शेख, मयूर सोनवणे, शरद पवार, बबलू अंधारे, गणेश औताडे, अक्षय डक, धनंजय मिसाळ, राम पंडित, सय्यद फय्याज, अक्षय पुराणिक, अफरोज पटेल, गणेश नावगैरे,गणेश पवार, मधुकर मरकड, राजू शाहा, वाशीम फारुकी, पंकज चव्हाण, प्रशांत जगताप, अंकुश साबळे,संतोष शेप, अक्षय शिंदे, यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक पाहा... राष्‍ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...