आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब फतवा..शॉर्टस, स्लिपर घातलेल्या इंजिनिअर्सला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, पोलिसांत तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याच्या गटामधील काही जणांना पायात स्लिपर आणि शॉर्टस घातल्याने त्यांना रेस्तरॉमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे हॉटेलच्या अजब फतव्याविरोधात संगणक अभियंत्यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये "एजंट जॅक' या रेस्टॉरंटमध्ये दहा जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता असीम त्रिभुवन, संजय होस्मानी, प्रदीप शालिनी, डॉ.अजित वाडेकर, विराज मुनोत आणि विलास कोंढाळकर हे जेवण्यासाठी गेले होते. या वेळी हॉटेल व्यवस्थापनाने काही जणांनी पायात स्लिपर व शॉर्टस घातल्याचे सांगत त्यांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. याबाबत हॉटेलचे संचालक अझर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी रिसेप्शन लॉबीमध्ये लिहिलेले नियम दाखवून व तुमचा ‘अॅपिअरन्स’ हा हॉटेल मधील कुठलाही सेवा घेण्यास योग्य नाही असे सांगण्यात आले आहे. याबाबत अभियंत्यांनी पोलिस नियंत्रण कक्षेला फोन करुन तक्रार केली असता, पोलिस उपनिरीक्षक आशिर्वाद शिंदे हे घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी माहितीची खातरजमा केली व पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविण्याचा सल्ला अभियंत्यांना दिला. 

 

आमच्या मूलभूत हक्कांवर गदा
असीम त्रिभुवन म्हणाले, हॉटेल संचालकांची सदर वर्तणुक मुळातच घटनाबाहय असून अशाप्रकारचे खाजगी नियम हे खरेतर मूलभूत हक्कांवर गदा आणत आहे, असा आमचा समज झाला आहे. अशाप्रकारच्या नियमांची नोंद एक गुन्हा म्हणून व्हावी व यासंबंधात योग्य ती पावले पोलिस प्रशासनाकडून उचलण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...