आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • ऑनलाइन शस्त्र खरेदी प्रकरण: Flipkart च्या दोन वरिष्ठ व्यवस्थापकांचा अटकपूर्व जामीन Online Weapon Sale Case Flipcart Managers Anticipatory Bail In Aurangabad

ऑनलाइन शस्त्र खरेदी प्रकरण: flipkart च्या दोन वरिष्ठ व्यवस्थापकांचा अटकपूर्व जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऑनलाइन शस्त्र खरेदीप्रकरणी ‘फ्लिपकार्ट’च्या दोन वरिष्ठ व्यवस्थापकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्‍यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.दिग्रसकर यांच्या समोर याप्रकरणी सुनावणी झाली. गोपनिय माहितीवरून ‘फ्लिपकार्ट’ची उपकंपनी असलेल्या इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नागेश्वरवाडी व जयभवानी येथील कार्यालयात छापे मारुन पोलिसांनी 42 शस्त्रास्त्रे जप्त केली होती.

 

या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘फ्लिपकार्ट’चे कमलदास (38, रा. फरीदाबाद, हरियाणा, ह.मु. मुंबई) व चंदर शेखर शर्मा (35, रा. शिमला, हिमाचल प्रदेश) यांना जबाबासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, तो कोर्टाने मंजूर केला. सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...