आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत फोटोग्राफरला धक्काबुक्की; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (शनिवार) शहरातील महत्त्वाकांक्षी ऑरिक-बिडकीन औद्यो‍गिक क्षेत्राचा दुपारी अडीच वाजता  उद्घाटन करण्यात आले. नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी प्रेस फोटोग्राफरला धक्काबुक्की झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकाराबाबत‍ खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आयोजकांना नीट व्यवस्था करण्याचा सुचनाही त्यांनी दिल्या. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस अधिक्षक आरती सिंह यांच्या समोर हा प्रकार झाला. आरोपींवर कारवाई करण्‍याचे आरती सिंह यांनी आश्वासन दिले.

 

ऑरिक-बिडकीन औद्यो‍गिक क्षेत्राचा उद्धघाटन सोहळ्याला यावेळी केंद्रीय वाणिज्य सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पालकमंत्री दीपक सावंत, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटेपाटील, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, रावसाहेब दानवे, उद्योग खात्याचे अप्पल सचिव सुनील पोरवाल, डीएमआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलकेश शर्मा उपस्थित होते.

 

ऑरिक पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी 2022मध्ये पूर्ण
ऑरीक पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी प्रकल्प 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. बिडकीनच्या तिन्ही टप्प्यांमध्ये 6400 कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा उपलब्ध करूण देण्यात येणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा सहा राज्यांतून जाणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रियल एरिया आणि रायगड जिल्ह्यातील पोर्ट इंडस्ट्रीयल एरियाचा समावेश आहे. शेंद्रा येथील 839 हे.क्षेत्राचा व बिडकीन येथील 1016 हे क्षेत्राचा विकास केला जात आहे.

 

3 लाख रोजगार मिळणार..
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ऑरिक-बिडकीन औद्यो‍गिक क्षेत्रामुळे तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. शेंद्रा-बिडकीन एमआयडीसीचे काम देशात सर्वात आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

बिडकीनमध्ये भविष्यात ड्रोन विमानाने उत्पादन होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय होत असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प असल्याचे प्रभु यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...