आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aurangabad Rape: अखेर ती बोलली.. होय, राहुल श्रीरामे यांनी केला माझ्यावर अत्याचार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी पीडित तरुणी अखेर बोलली. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तिने या व्हिडिओच्या माध्यमातून तिची आपबिती कथन केली आहे. पीडित तरुणी 22 वर्षांची असून ती महिला पोलिस कर्मचारीची मुलगी आहे.

 

पीडिते सांगितले की, 'चार महिन्यांपूर्वी राहुल श्रीरामे यांच्याशी ओळख झाली होती. एमपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो, तसेच पोलिस खात्यात नोकरीस लावून देतो, असे सांगत त्यांनी माझ्याशी ओळख वाढवली. यानंतर श्रीरामे यांनी प्रोझोन मॉलजवळील त्यांच्या फ्लॅटमध्ये मला बोलावले. आधी फ्लॅट क्र. 205 मध्ये येण्यास सांगितले. कोणी विचारले तर माझे नाव सांगू नकोस, पाटील मॅडमने बोलवले, असे सांग. त्यांनी जसे सांगत गेले मी तसे केले. नंतर फोन करून मला फ्लॅट क्रं.702 मध्ये येण्यास सांगितले. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर समोर श्रीरामे दिसले. मी त्यांच्यासोबत फ्लॅटमध्ये गेली. त्यांनी मला पाणी दिले. मी त्यांना विचारले सर, घरात दुसरे कोणी नाही? ते मला म्हणाले, मी बॅचलर आहे. नंतर ते माझ्याजवळ बसले. त्यांच्या तोंडाची मद्यची दुर्गंधी येत होती. मी त्यांचा प्रश्न केला. सर, तुम्ही ड्रिक घेतली आहे, ते म्हणाले, हो. मी त्यांना म्हटले सर मी निघते. नंतर येईल. परंतु ते किचनमध्ये गेले. त्यांनी हातात सुरी आणली होती. मला प्रचंड धक्का बसला. त्यांनी माझ्या हातावर सुरी ठेवत म्हणाले, मी तुला खूप लाईक करतो. तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुझा विश्वासघात करणार नाही. मी तुझ्यासोबत लग्न करेल. असे सांगितले, नंतर त्यांनी माझ्यावर बळजबरी केली. बलात्कार केला. सकाळी उठल्यानंतर ते मला महणाले की, ही बाब आपल्या दोघांमध्येच ठेव. याबाबत कोणाकडेही वाच्यता करू नकोस. मी तुझ्यासोबत लग्न करेल. मी तुला आयुष्यभर सांभाळेल. श्रीरामे यांनी चार ते पाच वेळा माझ्यावर बलात्कार केला. ते मला म्हणाले की, आता माझी बदली होणार आहे. माझे आधीच लग्न झाले आहे. मला एक मुलगा आहे. तु उच्चशिक्षित आहेस. तु चांगला जॉब मिळून जाईल. हे ऐकूण मला प्रचंड धक्का बसला. मी विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे तक्रार करण्‍यासाठी गेली. परंतु त्यांना मला तब्बल 2 तास बसवून ठेवले. भारंबे यांनी सांगितले की, श्रीरामेंविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. दोघे मिळून प्रकरण सेटल करा, असा सल्ला त्यांनी मला दिला.'  

 
पीडित तरुणी सापडेना, 4 जणांचे तपास पथक
पोलिसांना अजून सापडली नाही. तिच्या प्रत्यक्ष जबाबानंतर खऱ्या अर्थाने तपास सुरू होईल. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून तपासासाठी एका महिला पोलिस निरीक्षकांसह एक उपनिरीक्षक व दोन कर्मचारी असे चार जणांचे पथक नेमले आहे, अशी माहिती तपासाधिकारी विनायक ढाकणे यांनी दिली.

 

एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा...
25 जून रोजी पीडिनेते दिलेल्या व्हॉट्सअॅप तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला होता. तिने तक्रार दिल्यानंतर तिला महिला तक्रार निवारण केंद्रात बोलावले होते. तिची तक्रार अर्जावर सही घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला. आता जबाबासाठी पोलिस तिचा शोध घेत आहेत. तक्रारीत घटनाक्रम नसल्यामुळे लोकांचे जबाब घेण्यास अडचण निर्माण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...