आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rape Case: पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना अटक करा अन्यथा आंदोलन, रिपाइं पुनर्बांधणीचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बलात्काराचा अाराेप असलेले पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना तत्काळ अटक करण्यात यावी. श्रीरामे यांना का अटक होत नाही व कोणाच्या आशीर्वादाने हे खुलेआम फिरत आहे. गेल्या 22 जूनला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज किमान 20 ते 22 दिवस झाले तरी आरोपीला अटक का होत नाही. सर्व सामान्य पोलिस किंवा नागरीकास लगेच अटक होते. राहुल श्रीरामे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे, असा सवाल रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया उपस्थित केला अाहे.

 

आरोपीस कोण पाठीशी घालीत आहे. याचा शोध घ्यावा व पीडितेस  संरक्षण देण्यात यावे. येत्या 8 दिवसांत आरोपीस अटक न झाल्यास न्याय हक्क मिळवण्यासाठी क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणात जन संख्येने धरणे, निदर्शने, आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया पुनर्बांधणीच्या वतीने करण्यात आले आहे. या आशयाचे निवेदन सुनील औचरमल, किरण जाधव, महिला आघाडीच्या मीनाक्षी जावळे, शेख शबाना, रेखा जाधव, प्रवीण कौर, मनीषा पाटील, रेश्मा सौदागर, मंजू पालवे, रुबिना सय्यद,,रेखा चाबुकस्वार, अनिता चाबुकस्वार, प्रमिला खरात, जयमाला दाभाडे, विजया पगारे यांच्या वतीने पोलिस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...