आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; जामीन फेटाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील सहा वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणारा आरोपी शेख निसार अहमद शेख अली याचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी फेटाळला.

 

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरोधात कलम 376, 342, तसेच ‘पोस्को’ कायद्याच्या कलम 4, 11 व 12 अन्वये सिल्लोड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीला 10 मार्चला अटक करण्यात आली. त्याची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

 

काय आहे हे प्रकरण?
तिची मुलगी घराजवळच्या किराणा दुकानात गोळ्या-बिस्किटे आणण्यास जात होती. चार-पाच दिवसांपासून ती नीट जेवत नव्हती, घाबरत होती. 9 मार्च 2018 रोजी आई तिची आंघोळ घालत असताना, आरोपी शेख निसार अहमद शेख अली (35, रा. सिल्लोड तालुक्यातील गाव ) हा तिथे येताच पीडित मुलगी अचानक मोठ-मोठ्याने रडू लागली. तिला विश्वासात घेऊन विचारले असता, चिमुरडीने आपबिती आईला सांगितली. त्यानंतरही पुन्हा काही वेळा आरोपीने अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले.

 

आरोपी पुन्हा असा गुन्हा करू शकतो -कोर्ट
आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज केला असता, गुन्हा अतिशय गंभीर असून आरोपीला जामीन दिल्यास आरोपी असा गुन्हा पुन्हा करू शकतो. आरोपीवर कलम 394, 120 (ब) अन्वयेही गुन्हा दाखल असल्यामुळे आरोपीला नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास दोन वर्षे सक्तमजूरी

बातम्या आणखी आहेत...