आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडत व्यापाऱ्याच्या घरी चोरट्यांचा धुमाकूळ; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लासूर स्टेशन येथे एका आडत व्यापार्‍याच्या घरी दोन चोरट्यांनी आज (मंगळवार) पहाटे धुमाकूळ घातला. विनोद जाजू असे आडत व्यापार्‍याचे नाव असून त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना चोरट्यांनी बेदम मारहाणही केली.  विनोद जाजू यांच्यासह कुटुंबांतील सदस्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

पोलिसांच्या दुर्लक्षाने चोरीच्या घटना वाढल्या...

पोलिसांच्या दुर्लक्षाने चोरीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी नागपूर- मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी लांजेवार, स्थानिक पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, एलसीबीचे सुभाष भुजंग, दगा काबू पथकासह मोठा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...