आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद झाले भगवेमय; \'जय भवानी, जय शिवाजी\'च्या जयघोषाने दुमदुमले शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्‍ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 388वी जयंती आज (सोमवार,19 फेब्रुवारी) साजरी होत आहे. भगवे  फेटे, भगवे ध्वजांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे, सोबत जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले आहे.

 

सकाळी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शहरातील विविध ठिकाणच्या शिवराज्यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. याशिवाय संभाजी पेठ, गुलमंडी, टी पॉईंट, मुकुंदवाडी, गजानन महाराज मंदिर चौक, जयभवानी चौकातून भव्य मिरवणुकीसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

दिवसभरात व्याख्याने, चर्चासत्र, वृक्षारोपण, दुचाकी रॅली असे अनेक कार्यक्रम पार पडणार असून सायंकाळी विविध उत्सव समित्यांच्या वतीने भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारपासूनच शहरात ठिकठिकाणी या कार्यक्रमांची तयारी सुरू झाली होती.

 

नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, आमदार सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण,कल्याण काळे, एम. एम. शेख, मनमोहनसिंग ऑबेरॉय, मानसिंह पवार, नामदेवराव पवार, स्मिता घोगरे, राहुल श्रीरामे, श्रीकांत शेळके, उद्योगपती पद्माकर मुळे, त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, अविनाश आघाव, जालिंधर शेंडगे, राजू वैद्य,भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, अभिजित देशमुख, अविनाश आघाव उपस्थित राहणार आहेत. या वेळी गजानन मंदिर ते पुंडलिकनगर या मार्गावर मिरवणूक पार पडणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष बबन डिडोरे, शेखर म्हस्के,किरण धोत्रे,शिवा लुटे,महादेव जाधव,कृष्णा शेळके,पंजाबराव तौर,साहेबराव म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


वृक्षारोपणाचा कार्यक्रम...

महाराष्ट्र कारागीर बलुतेदार, अलुतेदार विकास सेवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रामपूर येथे 19 फेब्रुवारी रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्त्त्तम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे. सर्वांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचेआवाहन संयोजकांनी केले. आहे.

 

प्रमोद सरकटे यांच्या गीतांचा कार्यक्रम

नवीन आैरंगाबाद शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी सकाळी ९ वाजता वाहन रॅली तर सायंकाळी 5 वाजता गायक प्रमोद सरकटे यांचा शिवभक्तिपर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गजानन महाराज मंदिर चौकात होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे अावाहन उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल सावंत यांनी केली आहे.

 

सिडकोत दुचाकी रॅली

शिवसंग्राम प्रणीत शिवजयंती उत्सव समितीतर्फे सकाळी 8 वाजता क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. सकाळी साडे नऊ वाजता शिवछत्रपती कॉलेज सिडको येथून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता कडा ऑफिस मैदानावर आदर्श शिंदे प्रस्तुत 'शिव गर्जना' हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष किशोर पाटील चव्हाण, समिती अध्यक्ष राजेंद्र जगदाळे, प्राचार्य मनोज पाटील, विनोद तांबे यांनी केले आहे.

 

हडकोत डॉ. सतीश पवार यांचे व्याख्यान
राजे शिवछत्रपती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड उद्यान एन-9 हडको येथे साडे वाजता वाजता डॉ. सतीश पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 5 वाजता परमेश्वर महाराज पवार यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समिती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा.. शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल, बंदोबस्तासाठी 1400 पोलिस... मिरवणुकीचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...