आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

A\'Bad मनपाच्या ढिसाळ कारभाराचे 2 बळी..संतप्त नागरिकाने आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात कचर्‍यानंतर उघड्या नाल्यांचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराने आतापर्यंत दोन जणांना बळी घेतला आहे. सिडकोतील एन 6 परिसरात एक बुलेटस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती घेण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे पोहोचले असता त्यांना संतप्त नागरिकांना रोष सहन करावा लागला. एकाने थेट त्यांच्या श्रीमुखात लगावली.

 

सिडकोत आज (शुक्रवार) सकाळी हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओ) र‍वी गायकवाड असे या व्यक्तीचे नाव आहे. रवी गायकवाड यांची पीपल व्हाईस नावाची संघटना असल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

सिडकोत नाल्यात पडून एकाचा मृत्यू...

गुरुवारी मध्यरात्री शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले हाेते. सिडकाेतील एन-6 भागात लक्ष्मीदेवी मंदिराजवळील नालाही अाेव्हरफ्लाे झाला हाेता. मध्यरात्री 12 च्या सुमारास चेतन रत्नाकर चाेपडे (38, टेलिकाॅम साेसायटी एम सेक्टर एन-6) हे बुलेटवरून (एमएच 20 डीएच 8501) बजरंग चाैकातून घरी जात असताना त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज अाला नाही. त्यामुळे ते बुलेटसह नाल्यात पडले.

 

दरम्यान, नगरसेवक शिवाजी दांडगे व मकरंद कुलकर्णी यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने अग्निशामन दल व महापालिकेच्या पथकाला पाचारण केले. चोपडे यांचे आधारकार्ड पाण्यावर तरंगत होते. त्यावरून त्यांची ओेळख पटली. बचाव पथकाने पाऊणतास शोध घेतल्यानंतर चोपडे यांचा मृतदेह सापडला.

 

'त्या’ नाल्याने घेतला मजुराचा बळी!

मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील जयभवानीनगरात ओव्हरफ्लो होऊन वाहणाऱ्या नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाला होता. वीस वर्षांपासून उघड्या नाल्यावर ढापा टाकण्यास व त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करणार्‍या मनपाने हा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

भगवान निवृत्ती मोरे (50, मूळ रा. पवनी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह. मु. जयभवानीनगर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी पुन्हा भगवान मोरे यांचा शोध सुरू केला. तेव्हा परिसरातील नागरिक विजय साळुंके यांनी नाल्यात उतरून खाली पाहिले असता भगवान मोरे यांचा मृतदेह नाल्यातील गाळात आणि प्लास्टिक, नळाच्या पाण्याच्या पाईपमध्ये अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेडला घटनास्थळी बोलावून घेतले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढून घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...