आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिच्या करिअरची वाट निराळी..प्रियंका घ्यारे उकलते एसटी बसचा पार्टन् पार्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- करिअरिस्ट बनण्याच्या वेडाने झपाटलेल्या तरुणांपैकी बहुतेक चाकोरी सोडण्याचे धाडस करत नाहीत.परंतु काही वेगळी वाट निवडून यशाला गवसणी घालतात.  प्रियंका घ्यारे अशीच वेगळी वाट चोखळली आहे. करिअरमागे धावत झगमगीत आयुष्यासाठी आसुसणाऱ्या युवा पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी प्रियंका सर्वांसाठी आदर्श ठरली आहे.

 

प्रियंका घ्यारे ही एसटी महामंडळाच्या बाबा पेट्रोल पंप परिसरात असलेलेल्या विभागीय एसटी वर्कशॉपमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहे. प्रियंका ही मुळ अकोला जिल्हयातील वाडापूर तालुक्यातील कवढा बहादुरा गावाची. नोकरीच्या निमित्ताने ती औरंगाबादमध्ये आली.

 

वर्कशॉपमध्ये दाखल झालेल्या बसची तपासणी करायची, बॉडीफिटर,पिलर तुटलेले दुरुस्त करणे, तुटलेल्या खिड्या दारांची जोडणी करुन ती पुन्हा बसवणे,हॅण्डरेस्ट बनवणे आदी कामे अगदी खूबीने  प्रियंका पार पाडते. रोज साधारणपणे एक गाडी दुरुस्तीसाठी असते. त्यात चार पाच जणांनामिळून कामांची विभागणी केली जाते. त्यात सोपवलेली जबाबदारी दिलेल्या वेळेत पूर्ण करावी लागते. असे सांगतांना अत्यंत कठीण वाटणारे प्रत्येक नटबोलट प्रियंका अतिशय सावध आणि चपळतेने उकलत होती. आयटीआयच शिक्षण पूर्ण करुन वायरमन म्हणून निवडलेली वाट बिकट असणार असे सुरुवातीला वाटायचे. नोकरी लागली तेंव्हा प्रत्यक्ष काय काम करावे लागेल. माहित नव्हत. परंतु आज प्रत्यक्ष काम करतांना सर्व पुरुषांमध्ये आम्ही मोजक्याच मुली हे काम करतो आहे.याचा आनंद आणि समधान आहे. कुटुंबाची मिळणारी साथ हे करिअर निवडल्याचे समधान आणि प्रोत्साहन देत असल्याचेही प्रियंका सांगते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... प्रियंका घ्यारे हिचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...