आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्ट्‍स कारचा चाहाता होता हा तरुण; बंपरवर लिहिले होते असे काही आणि तसाच झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- स्पोर्टी कारचा चाहात्या तरुणाचा त्याच्या मित्रासोबत रस्ते अपघातात रविवारी (ता.14) रात्री मृत्यू झाला. बॉबी राऊत असे या तरुणाचे नाव होते. बॉबी आपल्या मित्रांसोबत नवी स्पोर्ट कार खरेदी करण्यासाठी जात होता.

 

भरधाव कार डिव्हायडर तोडून समोरुन येणार्‍या ट्रकवर आदळली. यात बॉबीसह त्याच्या एका मित्राचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. बॉबीची स्पोर्टी कारच्या छंदामुळे संपूर्ण शहरात ओळख होती.

 

कारच्या मागील बंपरवर लिहि‍ले होते असे काही...
- बाबा राऊत हा हॉलिवूड फिल्म 'फास्ट अॅण्ड फ्यूरियस'चा दिवाना होता. पॉल वाकर हा त्याचा रोल मॉडल होता.
बॉबीला सर्व मित्र 'स्पीड' या नावानेच संबोधत होते.
- "If One day the Speed Kills Me, Dont Cry Because i was Smiling" बॉबीने कारच्या मागील बंपरवर असे लिहिले होते. आणि रविवारी रात्री तसेच झाले.

 

भरधाव वेगच ठरला बॉ‍बीच्या मृत्यूचे कारण...
- बॉबी, गोविंद दायमा आणि निखिल सेठी हे तिघे रविवारी रात्री कारने औरंगाबादकडे निघाले होते. त्याची कार प्रचंड वेगात होती. बॉबीचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडर तोडून समोर येणार्‍या ट्रकवर आदळली.
- अपघातात कार चक्नापूर झाली.
- बॉबी आणि गोविंद दायमाचा जागेवरच मृत्यू झाला तर निखिल सेठी गंभीर जखमी झाला होता. निखिलवर उपचार सुरु आहेत.


बॉबीला ओळखू शकला नाही भाऊ...
- ट्रकखाली दबलेल्या कारमधून बॉबीसह तिघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या कामात क्रेनची मदत घेण्यात आला.
- बॉबीचा चूलत भाऊ औरंगाबादहून जालना जात होता. अॅक्सिडेंट स्पॉटवर तोही थांबला होता. त्याने जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी मदतही केली. परंतु तो बॉबीला ओळखू शकला नाही.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... स्फोर्टी कारचा चाहता बॉबी राऊतचे फोटो आणि अपघाताचे फोटो...