आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सअॅपवर अश्लिल चॅटिंग, शिक्षकांच्या तोंडाला फासले काळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल चॅटिंग करणार्‍या शिक्षकाला तरुणांनी काळे फसल्याची घटना सोमवारी सकाळी शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयात घडली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून तरुणीच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनोज जैस्वाल असे आरोपी शिक्षकांचे नाव आहे. 


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रोहिणी (नाव बदलले) ही तरुणी सरस्वती भुवन महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत 12 वीत शिकते. शिक्षक जैस्वाल हे मागील अनेक दिवसांपासून तरुणीला व्हिडिओ कॉल करून त्या तरुणीला अश्लील मेसेज टाकत होता ही बाब तरुणीच्या भावाला माहिती होताच 8 ते 10 तरुणांसह महाविद्यालय गाठले व स्टाफ रूम मध्ये बसलेल्या जैस्वाल यांच्या तोंडाला काळे फासले.

 

ही माहिती पोलिसांना लागताच पोलिसांनी महाविद्यालयगाठत शिक्षकाला ताब्यात घेतले आहे, तरुणीच्या फिर्यादीवरून क्रांति चौक पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...