आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DEATH: हर्सूल परिसरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहताना दोन मुलांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हर्सूल परिसरातील कोलथानवाडी रोडवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहताना दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सोहेल शफिक पठाण (11, रा. राठी नगर हर्सूल) व शेख युसुफ शेख युनूस(13, रा. यासिन कॉलनी, हर्सूल) अशी मृतांची नावे आहेत.

 

सोहेल आणि युसुफ हे दोघे दुपारी अडीच वाजता शाळेतून घरी आली. नंतर फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडले. कोलठाणवाडी सोडवरील अरबी स्कूलजवळील खड्‍ड्यात साचलेल्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघांची कपडे खदानीत सापडले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.

 

बातम्या आणखी आहेत...