आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात 24 तासांत दोन शेतकर्‍यांची आत्महत्या, खिशात सापडली चिठ्‍ठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु झालेले आत्महत्यांचे सत्र कायम असून गत चोवीस तासांत दोन जणांनी आत्महत्या केली. बीड तालुक्यातील पाटेगावमध्ये 32 वर्षीय तरुणाने तर गेवराई तालुक्यातील कांबीत 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली.

 

बीड तालुक्यातील पाटेगाव येथील दिगांबर माणिक कदम (वय-32) हा अल्पभूधारक शेतकरी असून बुधवारी आई- वडील व पत्नी शेतात होते. सायंकाळी घरात आडूला दोरीने गळफास घेऊन दिगंबरने आत्महत्या केली. रात्री कुटुंबीय शेतातून परतल्यावर त्यांना दिगंबरचा लटकलेला मृतदेह आढळून आला. मयत दिगंबरच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मराठा अरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कदम कुटुंबियास मदतीची मागणी करत गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी मदतीबाबत आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृ़तदेह ताब्यात घेतला. दिगांबर यांच्या पश्चात मयत आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

 

दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील कांबी येथील एकनाथ सुखदेव पैठणे (वय 45) यांनी बुधवारी सायंकाळी विष घेतले. गुरुवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या करण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. दरम्यान, तलवाडा पोलिस ठाण्याचे एपीआय मारुती शेळके यांनी मात्र पोलिसांत तशी नोंद नसल्याचे अथवा पैठणे यांनी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...