आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुखांनी कचराप्रश्नी औरंगाबादकरांची आज (गुरुवार) जाहीर माफी मागितली. उद्धव ठाकरे दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना मागील दोन महिन्यांपासून दुर्गंधीत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिवस ढकलणाऱ्या औरंगाबादकरांची त्यांनी जाहीर माफी मागितली.
शहरातील कचरा प्रश्नाला शिवसेना नव्हे तर राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगत त्यांना भाजपला टोला लगावला. शहरातील जनतेला कचराकोंडीमुळे सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच कचऱ्याच्या प्रश्नाबाबत महापौर आणि स्थानिक नेत्यांना हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
शिवसेनेने टोचले मुख्यमंत्र्यांचे कान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची जोरदार तयारी करत आहेत. पण, यावरुन शिवसेनेने त्यांचे कान टोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरलाच काशाला नेण्याची गरज आहे? त्यापेक्षा लोकहिताचे चांगले निर्णय घ्या, असा सल्ला दिला. सरकारकडे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमिनी जशा निर्बंध मुक्त केल्या तशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याही करा अशी मागणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.