आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस, 2-3 दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यात रविवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. तसेच येत्या 2-3 दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात वादळीवार्‍यासह गारपीटीची शक्यता असल्याचे एमजीएममधील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे.

 

उन्हाळा सुरु होऊन महिना उलटला आहे. सध्या मध्यमहाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहील. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या पश्चिमेकडे एक चक्रवात निर्माण होत आहे.  यामुळे येत्या दोन दिवसात कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.  चक्रावात पश्चिमेकडून उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला 14-15 मार्चदरम्यान सरकेल. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भागात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

पूर्व मराठवाड्यासह विदर्भात यंदा पावसाचे प्रमाण कमी
सध्या ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानात घट झाली असल्याने पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. सध्याच्या पश्चिमी विक्षोपीय वार्‍याचा अभ्यास केला असता हे वारे उत्तर गोलार्धात अजून सक्रिय आहेत. त्याचा परिणाम आपल्याकडे या येत्या दोन-तीन दिवसांत काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

 

गुडीपाडव्याच्या दरम्यान हे ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानावर याचा परिणाम होईल. यावर्षीचा उन्हाळा सुसाह्य राहील, असे दिसते आहे. याचा परिणाम येत्या पावसाळ्यात पूर्व मराठवाडा, विदर्भ, तेलंगणामध्ये पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...