आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराविना शाळा..मुलींसोबत बाईही खेळल्या लंगडी; पोरांसोबत सरांचीही रस्सीखेच अन् धप्पाकुटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एरवी अभ्यास केला नाही, म्हणून रागावणारे सर आणि बाई विद्यार्थ्यांसोबत खेळण्यात रमले. बाईंनी मुलींसोबत आंधळी कोशिंबीर, माझ्या मामाचं पत्र हरवलं, अशा खेळांची मज्जा लुटली, तर सरही मुलांसोबत धप्पाकुटी, रस्सीखेच आणि गोट्या खेळत होते. निमित्त होते, मुकुल मंदिर शाळेत आयोजित साने गुरुजी स्मृतिदिनाचे. गत 32 वर्षांपासून शाळेत दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.

 

मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी इतर शाळा सुरू होण्यापूर्वीच चार दिवस आधी येथे दप्तराविना शाळा भरवली जाते. या चार दिवसांत लगोरी, चिरकीपाणी, आंधळी कोशिंबीर, धप्पाकुटी, रस्सीखेच, गोट्या, चंफुल अशा खेळांत ते रमतात. दर शनिवारी साने गुरुजी कथामालेचे आयोजन करण्यात येते. शिक्षक संस्कार कथा सांगतात, नवे विद्यार्थीही यात सहभागी होतात. 24 डिसेंबर रोजी कथामालेची सांगता होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... आंधळी कोशिंबीर, माझ्या मामाचं पत्र हरवलं, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही लुटली अशा खेळांची मज्जा...

 

बातम्या आणखी आहेत...