आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर फुटून जीप कारवर आदळली; एक ठार, नवरदेवासह 22 बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - नवरदेवाच्या इन्होवा कारला समोरून भरधाव येणाऱ्या काळीपिवळी जीपने ढोरकीन-लोहगाव फाट्याजवळ जोराची धडक दिली, तर कारमागे असलेली काळीपिवळी इन्होवावर आदळून तिहेरी अपघातात नवरदेवासह २२ जण जखमी झाले. काळीपिवळी जीपमधील प्रवासी अमोल रावसाहेब बोबडे (२५, रा. इसारवाडी) हा जागीच ठार झाला. नवरदेव किरकोळ जखमी झाल्याने लग्नाला दोन तास उशीर झाला.  


याविषयी अधिक माहिती अशी की, चितेगाव येथील संजय राहटवाड (रा.चितेगाव) यांचे लग्न ढोरकीन येथील कांचन शंकर सोलाट हिच्याशी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता होते. चितेगावहून नवरदेव संजय राहटवाड हे इन्होवा गाडीने ढोरकीनकडे येत असतानाच पैठणहून औरंगाबादकडे जाणारी  एमएच २० बीटी ५६७३ ही तर औरंगाबादहून  महा १७ टी ५०८८ काळीपिवळी पैठणकडे वेगाने येत होती. यात पैठणकडून औरंगाबाद जाणाऱ्या काळीपिवळीची इन्होवा कारला जोराची धडक बसली. यात काळीपिवळीमधील प्रवासी अमोल बोबडे हा पुढील सीटवर बसलेला  यात जागीच ठार झाला, तर चालक सुधाकर बर्फे हा गंभीर जखमी झाला.  नवरदेवाला किरकोळ इजा झाली. यात मात्र इन्हाेवामधील पाच ते सहा वऱ्हाडी जखमी झाले. जखमींना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

 

जखमी प्रवासी
१) शारदा शिवाजी कोरडे (२५, रा. चितेगाव

२) कावेरी ताराचंद रहाटवाड (१७, रा. चितेगाव

३) ब्रह्मानंद संतोष बुट्टे ( ३५, रा. चितेगाव)

४)बबलू भाऊसाहेब खोमणे (३०, पिंपळवाडी

५) तेजस  ६) योगिता 

७) कुदरत पठाण (४०) रा. पैठण

८)सुधाकर भानुदास बर्फे (५४) रा. पैठण

९)नामदेव इंगळे (२५) रा. चितेगाव

१०) तुळसीबाई आसाराम खवले (८५) रा. धनगाव

११)गंगाधर हरिचंद्र कोचे (५८) रा.पैठण

१२)संभव कोरडे (५४) रा. चितेगाव

१३) पल्लवी रहाटवाड (१६) रा. चितेगाव

१४) रूपाली राजेंद्र भुट्टे (१०) रा.चितेगाव, यांच्यासह यात मुलेही जखमी झाले आहेत. इतर नावे कळू शकली नाहीत.

 

काळीपिवळी वेगात असल्याने अपघात

पैठणहून औरंगाबादकडे जाणाऱ्या काळीपिवळीचे टायर फुटले ही काळीपिवळी थेट इनोव्हा गाडीवर आदळली. यात काळीपिवळीचा वेग जास्त असल्याने टायर फुटले गेले.  त्यात चालक मोबाइलवर बोलत होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात असताना यात टायर फुटल्याने गाडी वरील नियंत्रण सुटले व हा अपघात घडला. यात जवळपास २२ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती काळीपिवळीत प्रवास करणारे नेपाळचे बलराम किसनसिंह यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाचे फोटो

बातम्या आणखी आहेत...