आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: छावणी परिषदेच्या अध्यक्षांनी दिले टोल नाक्याच्या चौकशीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नियमबाह्य वसुली प्रकरणी डीबी स्टारने पर्दाफाश करताच छावनी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडीयर डीके पात्रा यांनी विशेष बैठक घेत या संदर्भात सीईओ विजयकुमार नायर यांना सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी छावणीचे सीईओ नायर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

 

पुणे येथील जग्गी ट्रॅव्हल्स  गीरधारीलाल जग्गी यांनी १ मार्च रोजी छावणी पोलिसात दाखल केलेला फौजदारी गुन्हा, वृत्त प्रकाशित होण्याच्या आदल्यादिवशी नेवासा येथील रामेश्वर रावसाहेब तोरडमल यांनी यांनी केलेल्या तक्रारीनंतर अध्यक्षांनी हे पाऊल उचलले आहे.


औरंगाबाद - नगर - धुळे या मार्गावर छावणीचे सात टोलनाके आहेत. नियमानुसार छावणी परिषदेने टोलनाक्यावर प्रत्येक व्यावसायिक जड वाहनाकडून ६० रूपये शुल्क वसुल करण्याचे अधिकार दिलेले आहेत. पण टोलनाक्यावरील कर्मचारी वाहनधारकांकडून तिप्पट वसुली करतात. याशिवाय परिषदेने घालऊन दिलेले नियम धाब्यावर बसवत कर्मचारी वाहनधारकांशी अरेरावी करतात. यासंदर्भात १ मार्च रोजी पुण्यातील एक वाहनधारक गीरधारीलाल जग्गी यांनी छावणी परिषदेचे सीईओ विजयकुमार नायर यांच्याकडे देखील तक्रार केली होती. पण परिषदेने त्यांची गांभीर्यांने दखल घेतली नाही. त्यावर त्यांनी चित्रीकरणासह सर्व पुरावे देत छावनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 


याप्रकरणानंतर नांदेड ट्रक चालक मालक संघटना, मानवधिकार संघटना आणि अन्य सहा वाहनधारकांनी देखील तक्रार दाखल केली. मात्र, छावणी परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ७ एप्रिल प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत छावणी परिषद संस्था अधिनियम २००६ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सीईओ विजयकुमार नायर यांची नियुक्‍ती करुन ठेकेदारामार्फत टोलनाक्यावर लावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचनाही अध्यक्षांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...