आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टंट पर्यटनाचा ट्रेंड; महिनोन््महिने आधी नियोजन, अॅडव्हान्स बुकिंग कालबाह्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सुरक्षित आणि आनंददायक पर्यटनासाठी महिनोन््महिने हॉटेल, रेल्वे किंवा विमानाची बुकिंग करणे हे मराठी माणसाचे वैशिष्ट्य. यामुळे ऐनवेळी धावपळ, त्रास वाचतो हा पिढ्यान््पिढ्यांचा समज. मात्र, नवीन पिढी पर्यटनासाठी आता बुकिंग करत नसून अगदी ते दिवसांच्या अल्प मुदतीवर प्रवासाला निघत आहेत. पती, पत्नी आणि मुलांच्या एकत्रित सुट्या आणि कामाच्या व्यापामुळे खूप आधी टूर बुक करणे शक्य होत नाही. बुक केली तर रद्द करावी लागतो. यामुळे थोडा जास्तीचा खर्च झाला तरी चालेल, पण एकदा बुक केलेली टूर रद्द करण्यासाठी होणारा त्रास टाळण्यासाठी झटपट पर्यटनाकडे तरुणाईचा कल वाढलाय. 


पर्यटन क्षेत्रात कार्यरत मुसाफिर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली. संस्थेने औैरंगाबादसह पुणे, मुंबई, नागपूर आदी १६ शहरांत हे सर्वेक्षण केले. १८ ते ६० वयोगटातील २० हजारांहून अधिक पर्यटकांशी संपर्क साधला. यातील निष्कर्ष पर्यटन क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडवर प्रकाश टाकतात, अशी माहिती मुसाफिरच्या सहसंचालिका गायत्री तिगडोली यांनी दिली. ५२ टक्के उत्तरदात्यांनी ते १० दिवसांत टूरची योजना आखल्याचे सांगितले. पूर्वी टूरसाठी ते महिने आधी तयारी केली जायची. आता मात्र टूरची योजना आखली आणि लगेच बॅगा पॅक केल्याचे ५२ टक्के पर्यटक सांगतात.

 
सुमारे ६५ टक्के उत्तरदात्यांनी नियोजित ठिकाणी गेल्यानंतर हॉटेलचे बुकिंग केल्याचे सांगितले. तेथे पोहोचल्यावर हॉटेल शोधले. त्यातल्या त्यात दर आणि सुविधा यांचा मेळ साधून हॉटेल बुक केल्याचे ते म्हणाले. १८ ते २२ वयोगटातील पर्यटकांनी मित्रांसोबत पर्यटनाला पसंती दिली. २२ ते ३२ वयोगटातील विवाहित ७२ टक्के पर्यटकांना आपल्या मुलांसोबत पर्यटनाला जाण्याची इच्छा नाही. ३२ ते ४२ वयोगटातील ४५ टक्के पर्यटकांनीही जोडीनेच पर्यटनाला जाणार असल्याचे सांगितले. ४२ ते पुढील वयोगटातील ६८ टक्के पर्यटकांनी कुटुंबासोबत पर्यटनाला पसंती दिली. 


६५ टक्के पर्यटक करतात प्रत्यक्ष बुकिंग 
ऑनलाइनबुकिंगची सोय असली तरी ६६ टक्के पर्यटक त्याचा उपयोग फक्त माहिती घेण्यासाठी करतात. २६ टक्क्के काउंटरवर तर ६५ टक्के प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन बुकिंग करतात. टक्के पर्यटकांनी याबाबत ठरवले नसल्याचे सांगितले. उन्हाळ्यात १२ ते १५ दिवस, दिवाळीत ते दिवस तर नवीन वर्षानिमित्त ते दिवसांच्या पर्यटनाला सर्वाधिक पसंती असल्याचे गायत्री तिगडोली यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...