आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मुले चोरण्याच्या संशयावरुन पडेगावात दोघांना चोप, आठवडाभर इंटरनेट बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरासह वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरी आणि मुलांच्या अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवेचे पेव फुटले आहे. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवेतून शुक्रवारी पडेगाव येथे दोन युवकांना स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केली.

 

पडेगाव येथील कासंबरी दर्ग्याजवळ सुध्दा दोन मुले चोरणाऱ्या टोळीतील दोघे आल्याची अफवा पसरली. यावरुन मध्यप्रदेश च्या दोघांना जपळपास 200 जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. यात विक्रमनाथ लालूनाथ (35) आणि मोहन नाथ भैरुनाथ (32, रा. दोघेही मध्यप्रदेश, ह. मु. हर्सूल सावंगी) असे दोघांची नावे आहेत. छावणी पोलिसांनी तात्काळ धाव घत दोघांची सुटका केली.

 

इंटरनेट सेवा बंद...
सोशल मीडियावर चोरी आणि अपहरणाच्या अफवांना अक्षरश: ऊत आल्यानंतर वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात इंटरनेट सेवा बंद करण्‍यात आली आहे.  वैजापूरच्या उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार पुढील आठ दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी सात वाजेपासून पहाटे दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. चोरांच्या अफवेमुळे राज्यात इंटरनेट बंद करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.

 

दरम्यान, मागील आठवड्यात आठ जणांना चोर असल्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली यातील दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 400 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

 

मारहाण नका करु...
सध्या सर्वत्रच लहान मुलांचे अपहरण करणारे, चोरी करणारी टोळी आल्याच्या अफवा पसरत आहेत. नागरिकांना संशय जरी आला तरी त्यांना पकडून ठेवावे. परंतू कुठलिही मारहाण करु नका. पोलिसांना तात्काळ कळवा. पडेगाव मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी चोकशी कारवाई केली जाईल. तसेच पकडलेल्या दोघांची सुध्दा चौकशी केली जाईल.

- श्रीपाद परोपकारी, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, छावणी पोलिस ठाणे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...