आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- महानगरपालिकेच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राजेंद्र दाते यांनी अॅड. अनिल गोलेगावकर यांच्यामार्फत हस्तक्षेप याचिका दाखल केली असून समांतरच्या निविदा प्रक्रियेतच अनेक चुका व अनियमितता असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन आणि न्यायमूर्ती श्रीमती इंदू मल्होत्रा यांच्यासमोर याचिका सुनावणीस निघाली असता पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 


दाते यांची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित असून त्यावर सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा परिणाम होणार आहे. मुळात निविदा प्रक्रियेवरच आक्षेप आहे. मनपाने सर्वसाधारण सभेत कंत्राटदार कंपनीसोबत झालेला करार रद्द केलेला अाहे. औरंगाबाद खंडपीठाने याची त्यावर नोंद घेतलेली आहे. अनेक अनियमितता व कायदेशीर उल्लंघन कंत्राटदार औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने केले असून निविदा प्रक्रियेत अनेक चुका व अनियमितता असल्याची बाब या हस्तक्षेप याचिकेत नमूद केली आहे. गोलेगावकर यांना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड. सुधांशु एस.चौधरी, ॲड.शकुल आर. घाटोळे साहाय्य करत आहेत. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी व महानगरपालिकेच्या वतीने ॲड.गगन गुप्ता ॲड. अनिरुद्ध मायी यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...