आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास : सापडलेल्या स्त्री अर्भकाचा सापडले : पुरलेले पुरुष जातीचे अर्भक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड/ आमठाणा -  बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी शहरातील राजपूत हाॅस्पिटलचे डाॅ.गोविंद फुलचंद राजपूत व डाॅ.अरुणा गोविंद राजपूत दांपत्यासह गर्भवती महिला भिकाबाई व पती रघुनाथ शाहुबा गाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

   
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे २ जून रोजी अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संथगतीने सुरू असलेल्या पोलिस तपासाला बुधवार, दि.१३ रोजी अचानक गती आली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार यांच्या नेतृत्वाखालील  पथकाने सिल्लोड शहरातील राजपूत हाॅस्पिटल सील करून तपासणी केली. यानंतर तातडीने पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील  व कर्मचाऱ्यांचे  पथक केळगाव येथे रवाना झाले.

 

पोलिसांनी तेथील टेकडीवर तपास केला. येथील परिसरही सील केला होता. बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी बुधवार, दि.१३ रोजी दुपारी पाच वाजता  सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात डाॅ. गोविंद राजपूत, डाॅ.अरुणा राजपूत, गर्भपात करण्यात आलेली महिला भिकाबाई व पती रघुनाथ गाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

असे आहे प्रकरण
केळगावचे रघुनाथ शाहुबा गाडेकर यांची दुसरी पत्नी भिकाबाई गर्भवती राहिल्याने त्यांना तपासण्यासाठी येथील राजपूत हाॅस्पिटल येथे आणले होते. अपत्य नको असल्याने त्यांनी डाॅक्टरांशी संगनमत करून गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. पंचवीस हजार रुपयांत सौदा ठरला. राजपूत हाॅस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला. दि. २ रोजी आमठाणा चौफुलीवर अर्भक सापडले होते. 

 

दिव्य मराठीचा तपास
आठ जून रोजी पीडित रघुनाथ गाडेकर यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी केळगाव शिवारात अर्भक पुरल्याचे सांगितले. ते स्त्री जातीचे की पुरुष हे विचारले असता ते सांगतात डॉक्टरने औषधीचे हेवी डोस दिल्याने गर्भ स्त्री की पुरुष कळाले नाही. ते एका प्लास्टिक पिशवीत आणून आम्ही येथे पुरले होते. पोलिसांनी खोदले तेव्हा तेथे पावसामुळे काही सापडले नाही. दरम्यान दि. १३ रोजी पुन्हा पोलिसांनी तपास केला असता आम्हाला तेथे पुरुष जातीचे अर्भक सापडल्याचे सांगतात. त्यामुळे ते आमठाणा चौफुलीवर सापडलेले अर्भक कुणाचे असा प्रश्न आहे.

 

सापडलेले अर्भक स्त्री की पुरुष जातीचे संशयास्पद भूमिका

- २ जून रोजी आमठाणा चौफुलीवर सापडलेले अर्भक स्त्री जातीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. बुधवारी दाखल गुन्ह्यात पुरुष जातीचे अर्भक केळगाव शिवारात सापडल्याचे म्हटले आहे.     
- २ जून रोजी आमठाणा पेट्रोल पंपाजवळ ७ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. त्यानुसार सिल्लोड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. १३ जून रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथील डॉ. राजपूत दांपत्यांवर गुन्हा दाखल झाला. पीडित आरोपी दांपत्य केळगावचे रघुनाथ गाडेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी केळगाव येथे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केले त्यांना तेथे पुरुष जातीचे अर्भक सापडले. 

 

दोन्ही घटना भिन्न, सापडले पुरुष जातीचे अर्भक

२ जून रोजी आमठाणा चौफुलीवर सापडलेले स्त्री जातीचे अर्भक व आज दि. १३ जून रोजी केळगाव शिवारातील अर्भकप्रकरणी सुरू असलेला तपास या दोन भिन्न घटना आहेत. आजही आम्हाला केळगाव शिवारात पुरलेले अर्भक सापडले.
- गणेश बिरादार, 
उपविभागीय पोलिस अधिकारी 
 

बातम्या आणखी आहेत...