आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता यादीही गुरुवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सोमवारपर्यंत ३ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश नोंदणीसाठी आयटीआयने सोमवारपर्यंत मुदतवाढ दिली होती. ५ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी आणि १० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 


औरंगाबाद आयटीआयमध्ये २७ ट्रेडच्या ९८६ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरले आहेत. प्राथमिक गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवण्यासाठी ६ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध होईल. 

 

१० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपासून अंतिम गुणवत्ता यादी 
http://admission.dvet.gov.in येथे पाहता येईल. 

बातम्या आणखी आहेत...