आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समुळे जैतापूरच्या प्रकल्पाला विलंब, अाता अडथळे दूर : डॉ. काकोडकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फ्रान्सने अणुऊर्जा प्रकल्प उभा करणारी कंपनी बदलल्याने महाराष्ट्रातील जैतापूरच्या प्रकल्पाचे काम मागे पडले आहे. पण आता यातून मार्ग निघाला असून काही तांत्रिक बाबी पूर्ण होताच जैतापूरचे काम सुरू करता येईल. युरेनियमपासून वीजनिर्मिती करण्यासाठी भारताने ७०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे दहा रिअॅक्टरही घेतले अाहेत, अशी माहिती ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनी दिली.    


औरंगाबादेत साेमवारी एका कार्यक्रमासाठी अाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जैतापूर प्रकल्पाबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘भारताने अणुऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी फ्रान्सचे सहकार्य घेतले आहे. पूर्वी हे काम त्या देशातील अरेवा ही कंपनी करीत होती. याच काळात त्या देशात अंतर्गत व्यवस्थेत काही धोरणात्मक बदल झाले. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम त्यांनी ईडीएफ नावाच्या कंपनीवर सोपवल्याने पुन्हा सर्व सुरुवात नव्याने करावी लागली. ’ 

 

अणुऊर्जा आता खूप सुरक्षित..    
अणुऊर्जा तयार करताना खूप धोके असतात का, या प्रश्नावर काकाेडकर म्हणाले, ‘तुम्ही गुगलवर सर्च करा आणि माहिती घ्या. अशा प्रकारच्या ऊर्जानिर्मितीतील धोके खूपच कमी झाले आहेत. जपानमध्ये फुकुशिमामध्ये प्रलय झाला होता तेव्हा अणुऊर्जेचे रिअॅक्टर बंद केले होते. पण त्यांनी आता त्यांचे धोरण पुन्हा बदलले आहे. अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले आहे. तेच धोरण आपल्याला अंगीकारावे लागणार आहे. सरकारने याचा आराखडा तयार केला आहे. त्यावर काम सुरू आहे. कारण ऊर्जेच्या गरजा भागवल्या नाहीत तर मोठी आव्हाने उभी राहतील. भोपाळसारख्या दुर्घटना देशात होऊ नयेत म्हणून सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणेत मोठे सुधार केले आहेत.’

बातम्या आणखी आहेत...