आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४२७ उमेदवारी अर्ज वैध, २०१ अपक्षांची भाऊगर्दी; आता लक्ष माघारीकडे, १७ जुलैपर्यंत मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महानगरपालिका निवडणुकीसाठी १९ प्रभागात दाखल करण्यात अालेल्या ६१५ उमेदवारी अर्जाच्या छाननीत १८८ अर्ज बाद ठरले अाहेत. त्यामुळे ४२७ अर्ज वैध ठरले. यापैकी सुमारे निम्मे म्हणजे २०१ अपक्ष उमेदवार आहेत. माघारीसाठी १७ जुलैपर्यंतची मुदत असल्याने येत्या चार दिवसांत काय घडामाेडी घडतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून अाहे. माघारीच्या दिवसानंतर किती अपक्ष रिंगणात उरतात, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. 


महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ अाॅगस्ट राेजी हाेणार अाहे. यासाठीची तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करणे व त्याची छाननीची प्रक्रिया शुक्रवारी अाटाेपली. गुरुवारी ६१५ उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण हाेऊ शकलेली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत ते काम पूर्ण करण्यात अाले. दरम्यान एकूण अर्जांपैकी तब्बल १८८ अर्ज बाद झाले अाहेत. त्यामुळे अाता माघारीपर्यंत ४२७ उमेदवार रिंगणात राहणार अाहेत. माघारीची मुदत १७ जुलैपर्यंत असल्याने अडचणी दूर करण्यासाठी अपक्षांना माघारीसाठी गळ घातली जाण्याची शक्यता अाहे. 

अपक्षांची संख्यादेखील २०१ असल्याने किती अपक्ष उमेदवार निवडणुकीतून एक्झिट घेतात, हा देखील उत्सुकतेचा मुद्दा ठरणार अाहे. अपक्षांचे पारडे वजनदार ठरणार असल्याने त्यांना महत्त्वप्राप्त झाले अाहे. यंदा शिवसेनेच्या चार जागांवर पक्षाचे चिन्ह न दिले गेल्याने त्यांचे उमेदवार शिवसेना पुरस्कृत राहणार अाहेत. रविवारी शासकीय सुटी असल्याने शनिवार तसेच साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस पालिकेत माघारीसाठी धावपळ उडण्याची शक्यता अाहे. निवडणूक बिनविराेध करण्याच्या दृष्टीनेदेखील राजकीय पक्षांकडून प्रयत्न हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...