आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या कागदपत्रांवर नोकरी, औरंगाबादच्या 5 जणांना जळगावात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागात बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील तीन उमेदवारांसह दोन त्रयस्थांविरुद्ध येथे शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर व नागपूर येथून पडताळणी केल्यानंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.


प्रमोद बाबुराव राठोड, अरविंद बाबुराव जायभाये व संदीप प्रदीप बोराडे या तीन उमेदवारांना राजेंद्र पांडुरंग सानप व अजित दामोदर बुधेकर (सर्व रा. औरंगाबाद) यांनी बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचा आरोप आहे. २०१६मध्ये हिवताप विभागात बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी भरती घेण्यात आली.

 

या भरतीमध्ये राठोड, जायभाये व बोराडे या उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांना समुपदेशनासाठी जळगावातील आंबेडकर मार्केटमधील कार्यालयात बोलावण्यात आले. जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी अपर्णा अरुण पाटील यांच्यासमोर त्यांचे समुपदेशन झाले. या वेळी तिघांनी चंद्रपूर येथील हिवताप अधिकारी कार्यालयात हंगामी फवारणी केल्याचा अनुभवाचा दाखला दिला होता.दरम्यान, छाननीअंती हे दाखले आपल्या कार्यालयातील नसल्याचे ५ मार्च २०१८ रोजी चंद्रपूर येथून कळवण्यात आले. यानंतर पुन्हा नागपूर येथील सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) यांच्याकडे पडताळणीसाठी हे दाखले पाठवण्यात अाले होते. दरम्यान, ही कागदपत्रे बनावट असल्याचे उत्तर नागपूर येथून २५ मे २०१८ रोजी प्राप्त झाले होते.

 

जि.प. हिवताप विभागात रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
या तीन उमेदवारांनी चंद्रपूर येथे अनुभव घेतला असल्याचा खोटा दाखला मिळवला होता. दरम्यान, बुधेकर व सानप या दोघांनी आणखी काही उमेदवारांना अशा प्रकारचे दाखले दिले आहेत काय, त्यासाठी पैसे घेतले आहेत का, याची पोलिस चौकशी करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...