आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी कराडच; २५७ मतांच्या फरकाने जिंकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गतवर्षी केवळ १२ मतांनी पराभूत झालेले अॅड. अतुल कराड यांनी यंदा प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. नंदकुमार खंदारे यांच्यावर २५७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. 


अॅड. कराड यांना ६७२ तर अॅड. खंदारे यांना ४१५ मते मिळाली. सचिवपदाच्या अटीतटीच्या लढतीत अॅड. के. जे. सूर्यवंशी (५५१) यांनी अॅड. ज्ञानेश्वर बागुल (५३७) यांचा अवघ्या १४ मतांनी पराभव केला. ग्रंथालय समितीच्या सचिवपदी अॅड. श्रीनिवास गणाचारी (६६८) यांनी अॅड. कैलास जाधव (४२१) यांचा २४७ मतांनी पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...