आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे-जंजाळ एकत्र आले, पण एकच हार स्वीकारणे टाळले; खैरेंना शिरसाटांनी सुनावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांतून आडवा विस्तू जात नसलेले खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी सभागृहनेता राजेंद्र जंजाळ शनिवारी (३ फेब्रुवारी) एकत्र आले. आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने आयोजित सत्कार सोहळ्यात ते एकाच मंचावर होते. पण त्यांनी सत्काराचा एकच हार स्वीकारणे टाळले. 


गेल्या आठवड्यात खैरेंची शिवसेना नेतेपदी आणि जंजाळ यांची युवा सेना उपसचिवपदी निवड झाली. त्यामुळे शिवसैनिकांना एक चांगला संदेश देण्यासाठी शिरसाट यांनी संत एकनाथ रंगमंदिरात या सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात जंजाळ यांनी चाणाक्ष अंबादास दानवे, वय झालेले संजय शिरसाट असा उल्लेख करत मला आतापर्यंत सर्वांचे सहकार्य लाभले यापुढेही लाभेल असे म्हटले. खैरे यांचा उल्लेख करणे टाळले. पत्नीीचे तेरावे असूनही कार्यक्रमासाठी आर्वजून आलेले प्रदीप जैस्वाल यांनी दोघांनाही शुभेच्छा दिला. आपापसात वाद नको, असा सल्ला देऊन ते बाहेर पडले. 


सूचनेचे पालन : खैरे
शिरसाटांच्या सूचनेचे या कार्यक्रमापासूनच पालन करण्यास सुरुवात केल्याचे खैरे यांनी सांगितले आणि कृतीतूनही दाखवून दिले. त्यांनी राजू वैद्य, महापौर नंदकुमार घोडेले यांना शुभेच्छा देऊन एकतेचा संदेश दिला. दानवे आणि माझ्यातील वाद संपला असून सकाळी भांडून आम्ही संध्याकाळी बोलतो. टोकापर्यंत जाईल, असे आमचे भांडण नसतेच असा दावा त्यांनी केला. जंजाळ यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. 


यावेळी संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, विकास जैन, नगरसेवक मकरंद कुलकर्णी, ऋषी खैरे, सिद्धांत शिरसाट, रमेश बहुले, गिरजाराम हळनोर, विजय वाकचौरे, राजू राठोड, बाबासाहेब डांगे, लता पगारे, रंजना कुलकर्णी, कला ओझा, शिल्पाराणी वाडकर आदींची उपस्थिती होती. 


दोघांचे इकडे तिकडे
खैरे, जंजाळ यांच्यासाठी एकच हार होता. पण त्यांचा सूर पाहून दोन हार मागवण्यात आले. खैरेंचा सत्कार होत असताना जंजाळ इकडेतिकडे तर जंजाळांचा सत्कार होत असताना खैरे दुसरीकडे बघत होते. 


शिरसाटांची टोलेबाजी 
आमदार संजय शिरसाट यांनी मात्र जंजाळ, खैरे यांच्यावादासह अंबादास दानवे यांच्या वादाचेही उणे दुणे सर्वांसमोर आणले. तसेच खैरे यांना सल्ला दिला की, आपण कुणाचेच ऐकू नका. कुणाचे नाव घेऊन माघारी टिका टिप्पणी करु नका. तुमच्या तशा बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती मोठा होतो, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...