आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाची साक्ष ठेवणारे क्रांती भवन; माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- राज्यभरात ऐतिहासिक मराठा मोर्चा निघाले याची साक्ष असणारे मराठा क्रांती भवन पैठणमध्ये उभारले जाते ही एक क्रांतीच असून असे भवन उभारले ही नवतरुणांना प्रेरणा देणारे असल्याचे मत  माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केले. मंगळवारी पैठण तालुक्यातील कातपूर येथे महाराष्ट्रातील पहिले मराठा क्रांती भवनाच्या पायभरणी कार्यक्रमात बोलत होते. 


या वेळी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, स्थानिक आमदार, माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद तांबे, शिवसेना तालुकाध्यक्ष अण्णासाहेब लबडे, अप्पासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, देवीचंद मोरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे,नगरसेवक तुषार पाटील,अक्षय शिसोदे,अनिल जाधव, सरपंच साईनाथ सोलाट,काकासाहेब बर्वे,दीपक मोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मराठा क्रांती भवनाची पायाभरणी करण्यात आली. कातपूर येथील मोरे यांनी या भवनासाठी पाच गुंठे जमीन दिली असून मराठा समाजासाठी हे एक आदर्श भवन ठरणार आहे. या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे, अप्पासाहेब पाटील यांचीही भाषणे झाली. 


या वेळी दीपक मोरे, अक्षय शिसोदे, गणेश मडके, अतीश गायकवाड, आशिष मापारी, गणेश शिंदे, राहुल नरवडे, किशोर शिरावत,अक्षय कर्डीले, नंदकिशोर गोर्डे, प्रवीण औटे, नामदेव खरातसह तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


अद्ययावत असेल हे भवन   
राज्यातील पहिलेच मराठा क्रांती भवन असून ते अद्ययावत असणार आहे. या ठिकाणी वाचनालयसह एमपीएससी अभ्यासक्रम व इतर सुविधा असणार आहेत. हे भवन लवकर उभारले जावे यासाठी तरुण पुढाकार घेत असून बँकेमध्ये याचे खाते उघडण्यात आले असून समाजाच्या माध्यमातून या भवन उभारण्यासाठी योगदान असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...