आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुध वाहतूक करणा-या टेम्पोने दुचाकीला दिली धडक, महिलेचा पंजा तुटून पडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड -दुध वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. यापैकी एक महिलेच्या पायाचा पंजा तुटल्याची घटना ढेकमोहा जवळ रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. 


ढेकणामोहाकडे जाणाऱ्या व्यंकट केंद्रे यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुध वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघात व्यंकट केंद्रे, पत्नी गंगासागर केंद्रे, मुलगी यशश्री केंद्रे व एक वर्षाचा मुलगा जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की गंगासागर केंद्रे यांचा पायाचा पंजा तुटून वेगळा झाला. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...