आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळापूर येथे तरुणावर बिबट्याचा हल्ला; परिसरातील ही तिसरी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील रहिवासी सुनील गाडेकर व भाऊराव क्षीरसागर या दोन तरुणांवर बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत सुनील गाडेकर या तरुणाला जखमी केले. सुनील गाडेकर व भाऊराव क्षीरसागर हे दोघे बुधवारी रात्री दुचाकीने घराकडे येत होते. त्याचवेळी आश्वी-उंबरी रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्रालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने गाडेकर या तरुणावर झडप घातली. यामुळे गाडेकर व क्षीरसागर हे दोघेही खाली कोसळले.

 

दोघांनीही प्रसंगावधान दाखवत आरडाओरड केला. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गाडेकरच्या पायाला गंभीर जखम झाली, तर भाऊराव क्षीरसागर यास मुक्का मार लागला आहे. याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असल्याने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...