आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव हद्दीत खाणपिंप्रीत दहा दिवसांनंतर बिबट्या पकडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- पैठण तालुक्यात मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने शुक्रवारी शेवगाव हद्दीतील खाणपिंप्री येथे शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला केला. यातच तो बिबट्या विहिरीत पडला. शुक्रवारी सायंकाळी या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलगद उचलले. मात्र हा नर जातीचा बिबट्या पकडला असला तरी पैठणमध्ये मादी व तीचे दोन पिल्ले असल्याने पैठणमध्ये दहशत कायम असल्याचे दिसत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावती येथून एक पथक येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. 


महिलांवर हल्ला, अारडा ओरडीने बिबट्या अंदाज चुकल्याने विहिरीत 
शेवगाव लगतच्या गावातील खाणपिंप्रीतील शेतात काम करणाऱ्या महिलांवर या बिबट्याने हल्ला केला. अारडाओरड केल्याने नागरिक धावल्याने बिबट्याने पळ काढला अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. याची माहिती मिळताच वन अधिकारी गोविंद वैद्यसह टीम या ठिकाणी जाऊन त्या विहिरीलगत एक पिंजरा व काटेरी कुंपण तयार करून विहिरीत बाज सोडली. व बिबट्याला पकडले.

बातम्या आणखी आहेत...