आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओढणीने झाडाला गळफास घेत प्रेमी युगुलाची वैजापूर तालुक्यात आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- जांबरगावच्या प्रेेमी युगुलाने खंबाळा शिवारात शेतात झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. सागर राहुल म्हैसमाळे (२५) व साक्षी शेजूळ (१८) अशी त्यांची नावे आहेत. 

 

प्रेमविवाहाची संमती मिळणार नाही, या भीतीमुळे त्यांनी सोमवारी दुपारी घर सोडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी रात्रभर शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास खंबाळा शिवारातील संचेती फार्म हाऊसजवळील एका झाडाला प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिस तपासात मृत प्रेमी युगुल जांबरगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

बातम्या आणखी आहेत...