आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या महाराष्ट्र बंद नाही; अफवांवर विश्‍वास ठेवू नका- मराठा क्रांती माेर्चाने स्पष्ट केली भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठा क्रांती माेर्चाकडून दहा जानेवारी राेजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे, अशा अफवा साेशल मीडियावरून पसरवल्या जात अाहेत. त्यामुळे सकल मराठा समाजात संभ्रम निर्माण हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर  मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अावाहन केले अाहे. मराठा माेर्चाने बंद पुकारलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

 
काही विकृत मानसिकतेचे लोक समाजात तेढ निर्माण करण्याकरिता विघातक  कृत्ये घडवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. मात्र, सकल मराठा समाज त्यांना भीक घालणार नाही.  योग्य वेळी संयमाने उत्तर दिले जाईल. आजवर अाम्ही शांततेने लढा सुरू ठेवला.  समाजात दरी निर्माण हाेणार नाही याची काळजी घेतली. मात्र यामुळे अति दु:खी झालेले कुरापतखाेर अफवा पसरवत अाहेत. त्यांच्या कटकारस्थानाला बळी पडू नये, असा इशारा संघटनेने दिला अाहे. सकल मराठा क्रांती मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष-संघटनेने दिशाभूल करू नये, अन्यथा दोषींवर  गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...