आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांना आकर्षित करण्यात महाराष्ट्राची पीछेहाट; दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'व्हिजिट महाराष्ट्र' मोहीम अंतिम टप्प्यात असताना याचा फायदा  होण्याऐवजी पर्यटन विकासात महाराष्ट्राची पीछेहाट झालेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला मागे टाकत दिल्ली देशातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन राज्य ठरले आहे, तर गोव्याने तिसऱ्या क्रमांकावरून उडी घेत महाराष्ट्रासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. राज्याचे पर्यटनासाठी असलेले कमी बजेट, ब्रँडेड हॉटेल्सची कमी आणि कनेक्टिव्हिटीच्या निकषात कमी पडल्याने महाराष्ट्राचा दर्जा घसरला आहे.  वर्ल्ड ट्रॅव्हल्स टुरिझम काैन्सिल इंडिया इनिशिएटीव्हच्या वतीने दरवर्षी देशातील पर्यटनविषयक सर्वेक्षण केले जाते. त्यात ही बाब समोर आली  आहे.


महाराष्ट्रात परदेशी पर्यटकही घटले
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील परदेशी पर्यटकांची संख्या वाढली, मात्र महाराष्ट्रातील घटली आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा आणखी माहिती....

बातम्या आणखी आहेत...