आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसमधून उतरताच कारच्या धडकेने प्रवाशाचा मृत्यू, नातेवाईंकानी महामार्ग रोखून धरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर- तालुक्यातील सुरतगाव येथे शुक्रवारी  एसटी बसमधून उतरलेल्या प्रवाशाला भरधाव जाणाऱ्या अनोळखी कारने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बसचालकाने गावातील थांब्यावर बस न आणला राष्ट्रीय महामार्गावरच प्रवाशाला उतरवल्याच्या राग मनात धरून  दुसऱ्या दिवशी संतप्तग्रामस्थांनी अर्धा तास रास्ता रोको केला. सहकारमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. 

 

सुरतगाव येथील दत्तात्रय रामजी मगर (45) शुक्रवारी रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून उस्मानाबाद आगाराच्या बसने सूरतगावला आले. मात्र, चालकाने बस गावातील थांब्यावर न थांबवता त्यांना राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर त्यांना सोडले. यावेळी रस्ता ओलांडताना अनोळखी कारने धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीव मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यावर गावातील अन्य नातेवाइकांनी त्यांच्या मृतदेह सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. तेथे शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान शवविच्छेदन झाले. मात्र, मृतदेह ग्रामस्थांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. 

 

चालकाने गावातील थांब्यावर बस न थांबवता बायपासवर थांबल्यामुळे  हा अपघात झाल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या मारून वाहतुक बंद पाडली. एसटी बसच्या चालकावर कारवाई करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच  तुळजापुरचे तहसिलदार राहुल पाटील, मंडळ अधिकारी एस. व्ही. साळुंके, तलाठी आबासाहेब सुरवसे,  एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक राजीव साळवी यांनी तामलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन मिरकर यांच्यासह पोलिस पथकाची मदत घेऊन त्यांनी ग्रामस्थांना समजावले. याच वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख ताफ्यासह दौऱ्यावर चालले होते. ग्रामस्थ जमलेेले पाहून त्यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांना खरा प्रकार समजला. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून समजूत काढली. यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतला. तसेच संबंधित बस चालक व वाहकावर आंदोलन करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी एकला अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...