आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला नांदायला पाठविले नाही म्हणून जावयाने सास-याच्या अंगावर घातला ट्रक, जागीच झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडा। आष्टी - पत्नीला सासरी नांदण्यासाठी पाठवत नाहीत म्हणून संतापलेल्या जावयाने अंगणात झोपलेल्या सासऱ्याच्या अंगावर दहा टायरचा ट्रक  घातला. याच त्याचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. विठ्ठल चंद्रभान मराठे (वय, 55 )असे मृत सासऱ्याचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

 

मराठवाडी येथील विठ्ठल चंद्रभान मराठे यांची  मुलगी सुरेखाचा विवाह  पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे रावसाहेब शिंदे यांचा मुलगा अशोक याच्या बरोबर झाला असून जावई अशोक हा  ट्रक चालक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वाद झाल्याने सुरेखा ही  आठ दिवसांपूर्वी  माहेरी वडिलांकडे आली होती. 

 

सतत फाेन करूनही सासरचे लाेक सुरेखाला नांदायला पाठवत नसल्याचा राग मनात धरून अशोक रावसाहेब शिंदे याने गुरुवारी सिमेंटने भरलेला दहा चाकी ट्रक  पोहच करण्यासाठी निघाला असता नगर मार्गे तो मराठवाडी गावात आला. तेव्हा त्याला घरासमोरील अंगणात सासरे विठ्ठल चंद्रभान मराठे  हे झोपलेले दिसताच त्याने ट्रकचा  वेग वाढवून त्यांच्या अंगावर ट्रक घालत त्यांना चिरडले. या अपघातात विठ्ठल गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढे सासऱ्याचा छोटा टेम्पो लावला होता त्या टेम्पोलाही धडका दिल्या. यामुळे घरातील इतर मंडळी जागी झाल्याने त्याने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला. 

बातम्या आणखी आहेत...