आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारकडून मिळणाऱ्या 5 एकर जमिनीसाठी वीरपत्नींचा मेळावा, बुधवारी आयोजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - भारतीय लष्करात किंवा सशस्त्र दलात कार्यरत असताना वीरमरण अालेल्या अधिकारी, जवानांच्या महाराष्ट्रातील वीरपत्नींना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास पाच एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला अाहे. या विषयावर जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (सुधारणा) नियम २०१८ याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी (२५ एप्रिल) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आैरंगाबाद येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


लष्करातील वीरमरण आलेल्या जवानांच्या वारसांना पाच एकर जमीन असल्याची अधिसूचना नुकतीच सरकारकडून काढण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राज्यभर असा स्वरूपाची माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याचे सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील शहिदांच्या वारसांची बैठक २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रशासकीय इमारत, चौथा मजला विधान भवनासमोर, पुणे येथे आयोजित करण्यात अाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...