आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: ट्रक, हायवा चोरीच्या गुन्ह्यात एमआयएमचा नगरसेवकाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ट्रक, हायवा चोरीच्या गुन्ह्यात एमआयएमचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तर (३२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याला रविवारी भिवंडी पोलिसांनी अटक केली. २०१७ मध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासात नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहा अवजड व मालवाहू वाहनांची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे समोर आले होते. त्याचा तपास करत असताना अशा ३४ वाहनांची नोंदणी झाल्याचे उघड झाले होते. यातील २० वाहने जप्त करण्यात आली आहेत. याचा तपास सुरू असतानाच शेख जफर याचे नाव समोर आले. 


२०१७ मध्ये हायवा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले होते. तपासात नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन विभागात एकूण सहा अवजड व मालवाहू वाहनांची बनावट कागदपत्रे पोलिसांना मिळाली होती. तपास अधिकारी उपनिरीक्षक जोरी यांनी बनावट कागदपत्रांची नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात खात्री केली होती. तेव्हा अली हुसेन शेख व त्याला बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या आरोपींविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास भिवंडी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. टोळीने राज्यासह गुजरातमधून ३४ ट्रक व डंपर चोरून त्यांचा चेसिस व इंजिन क्रमांक बदलून ही वाहने नंदुरबार, बुलडाणा आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रांआधारे नोंद केल्याचे तपासात निष्पन्न झाले. 


चोरीच्या ट्रकचे पैसे जफरच्या खात्यावर
नारपोली पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात चोरीच्या ट्रक व डंपरचा पैसा कोणाच्या खात्यावर जमा होतो, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा औरंगाबादेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर याचे नाव समोर आले. त्यावरून भिवंडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत आणि सहायक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी ६ मे रोजी शेख जफरला अटक केली. जफर आणि त्याचा भाऊ शेख बाबर हे बनावट कागदपत्रांआधारे वाहनांची पासिंग करायचे. नोटरीआधारे विकलेल्या वाहनाची रक्कम जफरच्या बँक खात्यात जमा व्हायची. 


भिवंडीत अटक
प्रारंभी जफरचा भाऊ बाबर शेखला अटक केली. त्याच्या विरोधात शनिवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी पोलिस आपल्याला अटक करतील या भीतीने जफर त्या पथकाला भेटण्यासाठी भिवंडीत गेला. एमआयएमच्या पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन पोलिसांना पैसे देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...