Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Minister Chandrakant patil troll on social media for maratha reservation

मराठा आरक्षण कोर्टावर सोपवणारे चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर झाले ट्रोल, अशी उडवली खिल्‍ली

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 24, 2018, 07:45 PM IST

मराठा आरक्षणाचा निर्णय आता सरकारच्‍या हातात राहिला नाही, असे म्‍हणणा-या चंद्रकांत पाटलांना भूतकाळ नडला.

  • Minister Chandrakant patil troll on social media for maratha reservation

    औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा निर्णय आता सरकारच्‍या हातात राहिला नाही, अशी भूमिका मांडणा-या चंद्रकांत पाटलांवर सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे. विरोधी पक्षात असताना चंद्रकांत पाटलांनी 30 आमदारासंह विधान भवनासमोर मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन केले होते, याची आठवण त्‍यांना मराठा कार्यकर्त्‍यांनी करून दिली आहे.

    त्‍यावेळच्‍या धरणे आंदोलनाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर होत आहेत. यासोबतच वर्तमानात वायफळ बोलताना भुतकाळातही डोकावून पाहा, असा सल्‍ला त्‍यांना कार्यकर्त्‍यांनी दिला आहे. मात्र यानिमित्‍ताने विरोधात असताना एक भूमिका घेणारे व सत्‍तेत आल्‍यावर आपली भूमिका बदलणा-या लोकप्रतिनिधींचा चेहरा मराठा आरक्षणाची मागणी करणा-या कार्यकर्त्‍यांनी समोर आणला आहे. यावर चंद्रकांत पाटील काय उत्‍तर देतात, हे पाहणे आता महत्‍त्‍वाचे ठरणार आहे.

    काय म्‍हणाले होते चंद्रकांत पाटील?
    सांगली येथे मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना आज (मंगळवारी) चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय आता कोर्टाच्‍या हातात असल्‍याचे सांगून सरकारला जेवढे करणे शक्‍य होते तेवढे सरकारने केले, असे वक्‍तव्‍य केले होते. यामुळे सरकार या मुद्द्यावरून आपली जबाबदारी झटकू पाहत आहे, अशी भावना मराठा कार्यकर्ते व्‍यक्‍त करत आहे.

Trending