आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत स्टरलाइटची जी गत झाली तीच महाराष्ट्रामध्ये नाणारची होईल : सुभाष देसाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तामिळनाडूत स्टरलाइट कंपनी प्रकल्पाला लोकांनी केलेल्या विरोधानंतर १४ बळी गेल्यावर अखेर सरकारने माघार घेत शेवटी प्रकल्प रद्द केला. तो प्रकार महाराष्ट्रात नाणार प्रकल्पाबाबत होऊ शकतो. त्यामुळे लोकभावनेचा सरकारने विचार करून निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे व्यक्त केले. 


औरंगाबाद शहरात सुभाष देसाई यांच्या हस्ते राज्याच्या नव्या उद्योग धोरणाबाबतची आढावा बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या वेळी पत्रकारांनी त्यांना नाणार प्रकल्पाबाबत भूमिका विचारली असता ते म्हणाले की, नाणार येथे होणाऱ्या ऑइल कंपनीच्या प्रकल्पाच्या विरोधात लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. अजूनही तिथे लोकांचा प्रकल्पाला विरोध आहे. तेथे लोकभावनेचा विचार व्हावा; अन्यथा तामिळनाडूमध्ये स्टरलाइट कंपनीसाठी जे आंदोलन झाले त्यात १४ जणांचा बळी गेला. तशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका अाहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल मत स्पष्टपणे सांगितल्याचे देसाई यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...